Breaking News

व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये होणार वाढ


मुंबई : व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य व क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत एस.पी. जैन इन्स्ट‍िट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यात आज मंत्रालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि व्यवस्थापन क्षमता वाढण्यासाठी मदत होणार आहे. खाजगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचा हा राज्यातील पहिला करार आहे.

या सामंजस्य करारावर एस. पी. जैन इन्स्ट‍िट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्चचे अधिष्ठाता डॉ. रंजन मुखर्जी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सल्लागार डॉ. अपूर्वा पालकर उपस्थित होत्या.