Breaking News

सर्वसामान्यांचा बस प्रवास महागणार

मुंबई : इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांची एसटी महागणार आहे. एसटीसमोर अपरिहार्य तिकिट दरवाढीचे चिन्ह असून, लवकरच एसटी प्रशासन तिकिट दरवाढ करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती एसटी महामंडळामार्फत देण्यात आली आहे. वाढत्या डिझेल किंमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असल्याने महामंडळाला तब्बल 2 हजार 300 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. गेल्या वर्षी मे 2017 मध्ये एसटीला मिळणार्‍या डिझेलचा दर हा सरासरी 58.02 रूपये इतका होता. तो यंदाच्या मे महिन्यात सरासरी 68.39 रूपये एवढा झाला आहे. त्यामुळे प्रति लीटर 10.38 रूपये इतका जादा झाला आहे. वाढत्या डिझेल किंमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असल्याने महामंडळाला तब्बल 2 हजार 300 कोटी रुपये संचित तोटा झाला आहे. एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे 460 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.याचबरोबर इतकाच भार एसटीतील सुमारे 1 लाख कर्मचार्‍यांच्या होणार्‍या पगारवाढीमुळे भविष्यात सहन करावा लागणार आहे. तसेच महामार्गावरील टोल दरवाढीचा अतिरिक्त भार एसटीवर पडत आहे.