Breaking News

कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांचे शक्तीप्रदर्शन

कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील भाजपेतर सर्व मुख्य पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. अशाप्रकारे सर्व विरोधकांनी एकत्र येणे ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकल्याची नांदी आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपला बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे काँग्रेस व जनता दलाने (सेक्युलर) आपले आघाडी सरकार स्थापन केले आहे.