कुमारस्वामींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
काँग्रेसचे जी परमेश्वरम उपमुख्यमंत्रीपदी ; 2019 च्या निवडणूकीसाठी देशभरातील भाजपेतर नेते एकत्र
बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजप, काँग्रेस व जेडीएस यांच्यात झालेल्या चढाओढीनंतर बुधवारी जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेसचे जी परमेश्वरम यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध पक्षनेत्यांनी हजेरी लावली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीपीआयएम नेते सीताराम येचुरी, बसपा नेत्या मायावती, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, यांचे बंगळुरूत आगमन झाले आहे. जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज कुमारस्वामींच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपच्या बी.एस.येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर जेडीएस-काँग्रेसला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी 2019 मध्ये राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकात भाजपला पत्कराव्या लागलेल्या पराजयाचे पडसाद या राज्यांमध्येही बघायला मिळतील अशी शक्यता आहे.