Breaking News

अंबिकानगरमधील समस्यांची सोडवणूक करा : आ. कोल्हे


कोपरगाव शहर प्रतिनिधी  - संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात असणा-या अंबिकानगर परिसरातील रहिवासियांच्या गुंठेवारीसंदर्भात उदभवलेल्या अडचणींबाबत तहसिलदार किशोर कदम यांच्या उपस्थितीत आ. स्नेहलता कोल्हे यांनी बैठक पार पडली. २००१ पासून प्रलंबित असलेल्या समस्यांची सोडवणूक करावी, असे आ. कोल्हे यांनी या बैठकीत सांगितले.

भूसंपादन कोपरगांव तसेच नगररचना कार्यालय अहमदनगर याठिकाणी उदभवणां-या प्रश्नांत लक्ष घालून मार्ग काढू, अशी ग्वाही आ. कोल्हे यांनी दिली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, नगरसेवक जनार्दन कदम, स्वप्नील निखाडे, वैभव गिरमे, संजीवनीचे संचालक प्रदिप नवले, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर आदींसह अंबिकानगर परिसरातील रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी तहसिलदार किशोर कदम यांनी प्रास्तविक केले. 

ते म्हणाले, युती शासनाने तुकडेबंदी / तुकडेजोडअंतर्गत निर्माण झालेल्या गुंतांगुंतीच्या व्यवहारांना मान्यता देण्याबाबत अलीकडेच कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. मार्च २०१८ पर्यंत ठरावीक रक्कम भरण्याबाबत शासनाने अध्यादेष केला होता. त्यात ज्यांनी पैसे भरले असतील त्यांनाच याचा लाभ मिळेल. तर यातून राहिलेल्या रहिवाश्यांनी याबाबत पुन्हा नव्याने भूसंपादन कार्यालय, नगरपालिका मुख्याधिकारी आणि नगररचना कार्यालय अहमदनगर यांच्याकडे अकृशक जमीन करणे व त्याबाबत बांधकाम परवानगी मागणे आदिबाबतची सर्व पूर्तता त्या त्या रहिवाश्यांनी व्यक्तीगत अर्ज देवुन करावयाची आहे. शेवटी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी आभार मानले.