Breaking News

फोटोग्राफरच्या सुरक्षेसाठी १० लाखांचा विमा : नवले


राहुरी विशेष प्रतिनिधी : राहुरी तालुका प्रेसफोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या संचालकासह उर्वरित पदांची सर्वानुमते करण्यात निवड आली. यानिमित्त श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेत पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आढाव होते. यावेळी कुलदीप नवले, उपाध्यक्ष ईश्वर लहारे, माजी अध्यक्ष बाळासाहेब मुसमाडे. ज्येष्ठ फोटोग्राफर जालिंद्र मुसमाडे, सतिश कोबरणे, भारत दिघे आदी उपस्थित होते. धकाधकीच्या जीवनात फोटोग्राफरच्या सुरक्षेसाठी दहा लाख विमा पॉलिसी उतविण्याची घोषणा अध्यक्ष कुलदिप नवले यांनी केली. 
यावेळी सचिव गणेश नेहे, सहसचिव नवनाथ बेंद्रे, खजिनदार, दत्तात्रय पोपळघट यांच्यासह राहुरी तालुक्यातील गांवांचे गट करून संचालक निवडण्यात आले. यामध्ये भास्कर तनपुरे, अशोक धसाळ, मिलिंद वर्शिदकर, प्रशांत राहाणे, राजेंद्र नानेकर, किरण शेलार, भानुदास चव्हाण, बाबासाहेब कळमकर, अमिन शेख, अविनाश कोंडेकर, सोमनाथ शिरसाठ सुधाकर शिरसाठ, पप्पू चिकणे प्रविण जगताप, भाऊसाहेब विटनोर, संजय गोपाळे महेश साळे, शिवाजी लांडगे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी राहुरी तालुक्यातील असंख्य फोटोग्राफर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नेहे यांनी केले. अध्यक्ष कुलदिप नवले यांनी आभार मानले.