Breaking News

३ लाख ५० हजार रुग्णांनी घेतला मोफत सेवेचा लाभ


शिर्डी : साईबाबा संस्थान शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात ‘मोफत उपचार विकतची औषधे’ या रुग्णांच्या अडीअडचणींवर भाष्य करणारे वृत्त प्रकाशित केल्यानंतर यासंदर्भात संस्थानकडून दखल घेण्यात आली. मोफत सेवा देतांना या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. 
दि. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ३ लाख ५० हजार ६३४ रुग्णांनी संस्थानकडून विविध उपचार घेतले. वाढणारे रुग्ण कमी मनुष्यबळ व उपलब्ध डॉक्टर या सर्व अडचणी असतानाही रुग्णांनी मोठा प्रतिसाद दिला. बाह्य रुग्णविभागात १५ हजार ७१६ रुग्ण भरती झाले. १० हजार ९८३ लोकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात जनरल सर्जरी स्त्रीरोग, आर्थोपेडिक्स, कान, नाक, घसा आदींसह विविध उपक्रमाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. 

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात साईनाथ हॉस्पिटलमध्ये नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध रुग्णांनी उपचार घेतले असल्याचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे यांनी सांगितले.