Breaking News

महाराष्ट्र शासनाचे महत्वाकांक्षी निर्णय : राज्यपाल सी. विद्यासागर राव


कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे प्रत्यक्षात 25 हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढील वर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी 12 लाख घरे बांधण्याचा मनोदय तसेच पुढील पाच वर्षात एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती या शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयांचा पुनरूच्चार करीत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी उद्याच्या विकसित महाराष्ट्राचे वर्णन केले. शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. एक प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाबरोबर सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन करुन त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तानेही राज्यपालांनी यावेळी श्रमिक वर्गाला शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली