Breaking News

मुळा मुठा नदीत राडारोड टाकल्याप्रकरणी पालिकेनी बाजावली नोटीस

पुणे -  संगमवाडी येथील मुळा-मुठा नदीच्या पात्रात राडारोडा टाकून भरावा टाकल्याप्रकरणी पुणे पालिकेने नोटीसा बजाविल्या आहेत. तसेच पाटबंधारे विभाग संबंधितावर फौजदारी क ारवाई करणार आहे. 
संगमवाडी ते आळंदीकडे जाणा-या रस्त्यांच्या उजव्या बाजूस नदीपात्रात दीड किलोमीटर लांब नदीपात्रात राडारोडा टाकण्यात येत आहे. हे काम नदीपात्राच्या सीमा भिंतीपासून आतमध्ये 20 ते 25 मीटरपर्यंत सुरू आहे. या ठिकाणी गेली एक महिन्यापासून नदीपात्रात राडारोडा आणि माती टावूैन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामाकडे पालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी आ णि क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दररोज वीस ते पंचवीस ट्रक भराव नदीपात्रात टाकला जात आहे. परिणामी भविष्यात पुराच्या पाण्यामुळे पाटील इस्टेट आणि इतर झोपडपट्ट्यांना धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे भराव टाकणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केली होती. त्याची दखल घेउन संगमवाडी येथील मुळा-मुठा नदीच्या पात्रात राडारोडा टाकून भरावा टाकल्याप्रकरणी पालिकेने नोटीसा बजाविल्या आहेत.