राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून पालिकेत वारकर्यांच्या वेशात निषेध
पुणे, दि. 19, मे - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्याच्या निमित्ताने वारकर्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे मंडप यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उभारता येणार नाहीत. यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी गोंधळ घातला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वारकर्यांच्या वेशात येत याचा निषेध व्यक्त केला. पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्यांना सर्व सोयी सुविधा महापालिकेने पुरवाव्यात, गरज पडल्यास राज्यशासनाकडून निधी घेण्याची मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी कार्यक्रमावर खर्च करण्यास मज्जाव केल्याने वारीवरील खर्च आणि सोयीसुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. मात्र यातून प्रशासन आणि अधिकार्यांशी चर्चा क रून मार्ग काढला जाईल, तसेच गरज पडल्यास सर्व नगरसेवक आपले मानधन देऊन हा खर्च करतील असे भाजपचे नगरसेवक सुशील मेंगडे यांनी सांगितले.