Breaking News

‘आत्मा मालिक’च्या विदयार्थ्यांची इस्त्रो सहलीसाठी निवड

कोपरगाव :  जनसेवा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलित डॉ. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षेत ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलच्या ८० विदयार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. 
विदयार्थ्यांमधील संशोधनात्मक वृत्ती वाढविणे, विज्ञान विषयाची अभिरुची व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे हा या परीक्षेमागील मुख्य उद्देश होता. गुरुकुलात विज्ञान विषयाचे विविध उपक्रम राबविले जातात. तसेच विज्ञान विशयाच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेतली जाते त्यापैकीच हे एक सुयश आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिपक राऊत, वेदांत पवळे, सौरभ थोरात, सुजित लावरे, शुभम थोरात, अर्जुन विर, चेतन बाजड, श्रीकांत टोपे, विनोद वडघने, अभिषेक वाघ आदींचा समावेश आहे. या यशाबद्दल सर्व विदयार्थ्यांचे आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामन कोल्हे आदींनी अभिनंदन केले.