Breaking News

दिल्ली-मेरठ महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँगे्रसवर टीका


नवी दिल्ली - देशातील पहिल्या स्मार्ट आणि हरित ‘ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे’चे (ईपीई) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. महाभियोगाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत कायद्याचा मसूदा फाडणारे न्यायव्यवस्थेवर संशय उत्पन्न करतात, अशी टीका केली. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्हा क्रीडा संकुलात ईपीईचा लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून विक्रमी 18 महिन्यात एक्सप्रेस-वेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. लोकापर्ण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रमिकांचा महामार्गाच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्याचे म्हटले आहे. समन्वयातून 910 दिवसांचे काम 500 दिवसांत पूर्ण करता आले. भू-संपादनात शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्यात आला. महामार्गाचे निर्मितीमुळे 27 टक्के दिल्लीच्या प्रदूषणात घट होणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला अडीच लाख वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती मंत्री गडकरी यांनी यावेळी बोलताना दिली. मुंबई ते दिल्ली महामार्गाचे येत्या 15 दिवसांत भूमिपूजन करणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी जाहीर केले.