Breaking News

‘त्या’ चौदा जणांविरुद्ध फिर्याद


लोणी खुर्दच्या ग्रामसभेत एका विषयावरील वादंगामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गावातील १४ जणांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची फिर्याद दिली. सरपंच मनिषा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत हा प्रकार घडला होता. 
येथील लोमेश्वर मंदिरात महाराष्ट्रदिनी सकाळी दहाच्या सुमारास ग्रामसभा सुरु असताना चौदा ग्रामस्थांनी गर्दी करत या ग्रामसभेत आयत्या वेळेच्या विषयावर परवानगी न घेता एका विषयाचा ठराव मांडला. त्यानंतर धक्काबुक्की करून ग्रामसभेचे कामकाज पाडले. दरम्यान, सरपंच आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काहीवेळ समन्वय घडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नाईलाज झाल्याने फिर्याद देण्यात आल्याचे सांगण्यात आले.