Breaking News

भिगवणमध्ये दोन दुचाकींची चोरी

कुळधरण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून दोन दुचाकींची चोरी झाल्याची घटना रविवारी (दि.29) रात्री घडली. कर्जत तालुक्यातील आखोणी येथील रामदास सायकर यांची दुचाकी भिगवण येथुन चोरीस गेली. तसेच भिगवण येथील वडापावचे विक्रेते आटोळे यांची युनिकॉर्न गाडी चोरट्यांनी लंपास केली.
भिगवण येथील जिल्हा परिषद शाळेजवळील उत्तम विहार येथून सायकर यांच्या दुचाकीची चोरी झाली. हिरो होंडा कंपनीची शाईन (एमएच 42, एस 8063) क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी पळविली. पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी गेट उघडुन चोरट्यांनी पळवुन नेली. आटोळे यांची युनिकॉर्न गाडी रविवारच्याच रात्री चोरीस गेली.भिगवण येथे या पूर्वीही दुचाकींच्या चोरीचे प्रकार घडल्याने भिगवणकर त्रस्त झाले आहेत. भिगवण पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार देण्यात आली असुन पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.