Breaking News

घारगाव ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस वाढली


संगमनेर :  तालुक्याच्या पठार भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठीच्या उमेदवारांमधील ४ जणांनी तर, सदस्यपदासाठी ११ जणांनी माघार घेतली आहे. प्रभाग दोन व चारमधील दोन महिला उमेदवार बिनविरोध घोषित झाल्या आहेत. यासाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात कमालीची चुरस वाढली आहे. 
घारगावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत ३ हजार ३३१ लोकसंख्येपैकी २ हजार २४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून जया राजेंद्र गाडेकर (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री) आणि प्रभाग क्रमांक ४ मधून रुपाली रविंद्र कान्होरे (सर्वसाधारण महिला) बिनविरोध घोषित झाल्या आहेत. तर सरपंचपदासाठी अर्चना नितीन आहेर, ज्योती संतोष नाईकवाडी, उषा रमेश आहेर, प्रिया राहुल आहेर या चार महिला रिंगणात आहेत. उर्वरित चार प्रभागांतील ११ जागांसाठी प्रभाग १ मधून - मनिषा नवनाथ गाडेकर, संध्या संभाजी धात्रक (नागरिकांचा मागास प्रवर्ग), मीनल गौरव आहेर, प्राजक्ता राहुल आहेर, (सर्वसाधारण महिला ), गणेश हनुमंता आहेर, विजय रामचंद्र धात्रक आदींसह अनेकी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.