Breaking News

खळी येथील जिल्हापरिषदेच्या शाळा डिजिटल माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

आश्वी : प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील खळी येथील सहकार महर्षि स्व. भाऊसाहेब संतूजी थोरात विद्यालयात शिक्षण घेत अनेक विद्यार्थी आप-आपल्या व्यवसायात स्थिरावले. त्यांनतर या माजी विद्यार्थ्यांनी गावासाठी बांधिलकी जपत हे माजी विद्यार्थ्यी एकत्र आले. या तरुणांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शाळेच्या मदतीसाठी मोहिम राबवत अल्पावधीत भरीव योगदान दिले. जमलेल्या पैशातून या माजी विद्यार्थ्यांनी गावातील ३ शाळा डिजिटल करत भविष्यातील पिढ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

माजी विद्यार्थी सोन्याबापू तांबे, अण्णासाहेब सानप, रामदास लबडे, दिगंबर तांबे, अनिल नागरे, सुनील तांबे, अनिल कांगणे, रामदास नागरे, अमोल तांबे, भाऊसाहेब चौधरी, गणेश उगलमुगले, धनेश घुगे, गणेश सातपुते, संतोष जोशी, नवनाथ घुगे, एकनाथ उगलमुगले, रामभाऊ घुगे, दिनकर घुगे, बबन वाघमारे, लक्ष्मण उगलमुगले, सर्जेराव चकोर, रोहिदास सानप, राजू कांगणे यांनी शाळेला एक डिजिटल टचस्क्रीन स्मार्ट बोर्ड, दोन मोठे डष्टबीन आणि इंटरनेट जोडणीसाठी एक वायफाय मोडेम भेट दिले. 

दरम्यान, या संकल्पनेने प्रेरित होत अनेक माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत खळी आणि कांगणवाडी येथील जिल्हा परिषेदेच्या दोन शाळा डिजिटल केल्या. लबडे वस्ती व चकोर वस्ती येथील शाळा डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या डिजिटल क्रांतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शिक्षण प्रक्रिया अतिशय सुलभ आणि आनंददायी झाली असल्याची भावना शिक्षक बोलून दाखवली. माजी विद्याथ्यांच्या या उदात्त हेतूचे स्थानिक स्कूल कमिटी आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.