Breaking News

हत्तींनी केले केळी बागांचे लाखोंचे नुकसान


सिंधुदुर्ग, दि. 27, मे - कर्ज काढून शेती बागायती केलेल्या दोडामार्ग तालुक्यातल्या वीजघर राणेवाडी परिसरातल्य युवकांच्या केळी बागायतीच हत्तीच्या कळपाने गेल्या तीन रात्रीत लाखोंच नुक सान केलय. एक तर योग्य भरपाई द्या नाहीतर शेतकर्‍यांना जमीन पडीक ठेवण्यासाठी वार्षिक दहा लाख रुपये द्या अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.

वीजघर राणेवाडी, घाटीवडे, बान्बर्डे परिसरात तीन हत्तींचा कळप अधूनमधून शेती बागायतीत घुसून त्या उध्वस्त करताहेत. गेल्या दोन दिवसांत या रानटी हत्तींनी सिद्धेश राणे, दत्ताराम देसाई आणि अन्य शेतकर्‍यांचे केळी, माड,पोफळी यांच मोठे नुकसान केले. त्यापैकी अनेक तरुणांनी नोकरी नसल्याने कर्ज काढून शेती बागायती केली आहे. केळीच्या बागा घडानी लगडलेल्या आहेत. उत्पन्न हाती येण्याआधीच बागा हत्तींनी उध्वस्त केल्यान आता त्यांच्यासमोर कर्ज कस फेडायचे आणि जगायच कसे असा प्रश्‍न आहे.
दरम्यान, वीजघर राणेवाडी इथल्या सिद्धेश राणे आणि दत्ताराम देसाई या दोघा युवकांच तीन रात्रीत हत्तींच्या कळपान तीन लाख साठ हजार रूपयांच नुकसान केलय. हत्तींनी सिद्धेशच्या 400 तर दत्तारामच्या 200 केळी नाहीशा केल्या.

साधारणपणे एका केळीला अडीचशे ते तीनशे रुपये खर्च येतो. एक घड सरासरी 500 ते 600 रुपयाला विकला जातो.गोवा मन्डोळ केळ असेल तर घडाचे एक हजार ते बाराशे रुपये मिळतात. पण हत्तींच्या धुडगुसामुळे नफा सोडा; बागायतीत घातलेले पैसेही मिळत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारीवर मात करू पाहणार्‍या तरुणांचे अर्थकारण कोलमडत आहे.

सलग तीन दिवस हत्तींनी आपला डेरा वीजघर परिसरात टाकला आहे.दिवसभर जवळच्या जंगलात राहायचे आणि दिवस मावळताच गाव गाठायचे असा तीन दिवसांचा त्यांचा दिनक्रम आहे. या तीन दिवसांत त्यांनी तीन लाख साठ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. दरम्यान आयनोडे बोरयेवाडी ते बाबरवाडी दरम्यान नर्सरी नावाचा परिसर आहे.तेथे आणखी एक हत्ती शुक्रवारी रात्री होता; मात्र त्याने फारसे नुकसान केले नाही. फणसावरच त्याने ताव मारला.