भविष्य निर्वाह निधी रक्कम थेट कर्मचार्यांच्या खात्यात जमा होणार - डॉ.नरेश गिते
नाशिक, दि. 30, मे - जिल्हा परिषद वर्ग तीन व वर्ग चार कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम यापुढे थेट कर्मचार्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यक ारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
जिल्हा परिषद वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचार्यांना त्यांच्या अडी अडचणीच्या वेळी अधिक गरज भागविण्यासाठी आपल्या हक्काच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये शिल्लक असलेल्या रकमेमधून रक्कम क ाढता येते. परंतु ,कर्मचार्याला त्यांच्या आवश्यकतेनुसार सदर रक्कम वेळीच त्याची अधिक गरज भागविण्यासाठी उपलब्ध होत नव्हती.
यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून प्रचलित शासन आदेशानुसार यापुढे पूर्वीच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. यापूर्वी कोषागारातून धनादेश प्राप्त होणे, तो धनादेश जिल्हा परिषद खात्यावर जमा करणे व जिल्हा परिषदेने त्यानंतर तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या नावे जमा करणे. जिल्हास्तरावर खातेप्रमुख यांच्या नावे धनादेश देणे. त्यानंतर कार्यालय प्रमुख ,खाते प्रमुखांच्या खात्यावर पैसे जमा होत होते. ते झाल्यानंतर कर्मचार्याला धनादेश दिला जात होता.
या सर्व कार्यपद्धतीला कर्मचार्याने अर्ज केल्यापासून ते रक्कम मिळेपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी लागायचा. त्यात बदल करून आता यापुढे वित्त विभागातून थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यावर पंधरा दिवसांमध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा होणार आहे .
