Breaking News

नांदगावच्या उपसरपंचपदी बाळासाहेब मानसिंग निंबाळकर बिनविरोध


कर्जत : नांदगाव येथे आज सरपंच अशोक वाळूंज यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी बैठक पार पडली. यामध्ये बाळासाहेब मानसिंग निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नांदगाव येथे सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी बैठक पार पडली. यावेळी सकाळी 10 ते 11 अर्ज स्वीकारणे, 11 ते 12 अर्ज पडताळणी, दुपारी 12 ते 1 माघार घेण्यासाठी, तर 2 वाजता मतदान असा वेळ देण्यात आला होता. त्यानुसार बाळासाहेब निंबाळकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. एकच अर्ज आल्याने निंबाळकर यांना दु. 2 वाजता उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी बाळासाहेब निंबाळकर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करत गुलालाची उधळण केली. यावेळी नांदगावचे ग्रामसेवक शाम भोसले, ग्रा.स. रावसाहेब म्हस्के, संगीता बागल, संगीता गुंजाळ आदी सदस्य उपस्थित होते.