Breaking News

काठीटेक याठिकाणी डोंगरी परिषद व कार्यकर्ते मेळावा उत्साहात


सातारा, दि. 16, मे - गेली 26 वर्षे डोंगरपठारावरील गांवानी आणि वाडयावस्त्यांनी माजी आमदारांना पोत्याने भर-भरुन मते दिली त्या माजी आमदारांनी डोंगरपठारावरील गावांमध्ये किती विकास केला?असा सवाल करीत गेली साडेतीन वर्षे मी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना डोंगरपठारावरील या विभागातील सुमारे 15 ते 20 गावांमध्ये कोटयावधी रुपयांची विकासकामे करुन दाखविली आहेत.डोंगरी परिषद आणि कार्यकर्ते मेळाव्याला येताना मी या विभागात केलेल्या विविध विकासकामांचा लेखी पुरावाच सोबत घेवून आलो असून यापुर्वी डोंगरपठारावरील गांवाना आणि वाडयावस्त्यांना दिलेल्या कामांच्या दुप्पट कामे यंदाच्या वर्षी देवून डोंगरपठारावरील या गांवाचा विकास साधणार असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी डोगंरपठारावरील गांवे व वाडयांवस्त्यांक रीता आयोजीत डोंगरी परिषद व कार्यकर्ते मेळाव्यात बोलताना ग्रामस्थांना दिली.डोंगरपठारावरील संपुर्ण गावांच्या व वाडयावस्त्यांमधील जनतेच्या समस्या व अडीअडचणींचे निरसण करणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काटीटेक ता.पाटण याठिकाणी डों गरी परिषद व कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता.

याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,यापुर्वी या विभागातील डोंगरपठारावर आम्हाला बसायला घोंगड टाकलं तरी त्या ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचे प्रकार विरोधकांकडून घडत होते परंतू या विभागातील ग्रामस्थांनी विरोधकांची दडपशाही धुडकारुन निर्भिड झाल्यामुळे कोटयावधी रुपयांची विकासकामे पठारावर होवू शकली.गत साडेतीन वर्षात मला या विभागातील असो वा तालुक्यातील प्रत्येक विभागातील गांवामधून असो विधानसभेच्या निवडणूकीला किती मते पडली याचा कधीच विचार न करता ज्यां ज्या गांवानी माझेकडे कामे मागितली त्या त्या गावांना आणि वाडयावस्त्यांना कामे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.आज पठारावर येताना विकास घेवूनच आलो आहे.

यापुर्वीचे माजी आमदार कधी कुठल्या भागात जनतेच्या दारात माझेकडे विकासकामे मागा म्हणून आल्याचे पठारावरील जनतेने कधी अनुभवले तरी आहे काय? पठारावर राहू दया परंतू तालुक्यातील जनतेच्या पुढे मला विकासकामे मागा म्हणूनही ते कधी गेल्याचे एैकिवात नाही असे सांगून ते म्हणाले,माजी आमदारांकडे काम मागायला जायचे म्हटंल्यावर गावेच्या गावे घेवून वाडयाच्या पाय-या चढून जावे लागायचे, मग पुढारी मध्यस्थी करायचा तो आत जावून माजी आमदारांना भेटून यायचा जनतेची भेट झाली न झाली परंतू तोच मध्यस्थी पुढारी तुमचे काम झाले म्हणून सांगत यायचा प्रत्यक्षात मात्र काहीच काम पदरात पडायचे नाही अशी अवस्था यापुर्वी होती.यामुळे आपल्या सर्वांची 25 वर्षे वाया गेली.आज मी आपल्या समस्या जाणून आणि समजुन घेवून त्या सोडविण्यासाठी तुमच्या दारात आलो आहे.आपण मागेल ती कामे देवू पण भविष्यात कुणाच्या दबावाला बळी पडू नका. दडपशाहीचा जमाना गेला.आता केवळ हाक दया.आमदारांकडे काम मागायला कशाला गेला असे जरी कुणी विचारले तरी घाबरू नका कारण जे तुमच्यावर दबाव आणणार आहेत त्यांच्या हातात देण्यासारखे असताना ते आपल्याला काही देवू शकले नाहीत आता त्यांच्या हातात देण्यासारखे काही नसताना ते आपल्याला काय देणार आहेत? याचा सारासार विचार पठारावरील ग्रामस्थांनी करावा.जो देवू शकतोय त्याची पाठराखण केल्यास आपल्या पदरात बरच काही पडणार आहे. परंतू जो काहीच देवू शकत नाही त्याची पाठराखण करुन काही एक उपयोग होणार नाही हे ग्रामस्थांबरोबर महिला व युवक वर्गाच्याही आता चांगलेच लक्षात आले आहे.राहिलेली विकासकामे पुर्ण करण्याकरीता मी कटीबध्द असून गत तीन वर्षात जेवढी कामे डोंगरपठारावर झाली आहेत येत्या वर्षात त्या कामांच्या दुप्पट कामे पठारावरील उर्वरीत राहिलेल्या गावामध्ये व वाडयावस्त्यांना देण्यात येतील अशी ग्वाही देत या विभागातील घाणबी येथील ग्रामदैवताचे देवालयाकरीता निधी देतो म्हणून सांगून विरोधकांनी उलघडण्यास सांगितलेले देवालयाचे काम मी आमदार नसताना देखील पुर्ण करुन दिले.
तसेच मरड धनगरवाडी येथील पुलाची मोठी गैरसोय विरोधकांना इतक्या वर्षात दुर करता आली नाही मी ते काम करुन दाखविले आज हे काम सुरुदेखील झाले असल्याचे सांगून अपेक्षेप्रमाणे पठारावरील गांवाना कामे देण्याचा शब्द त्यांनी शेवठी बोलताना ग्रामस्थांना दिला.उपस्थितांचे स्वागत बबनराव माळी यांनी केले व आभार रामचंद्र पवार यांनी मानले.