Breaking News

अ‍ॅट्रासिटीच्या निर्णयाला स्थगिती नाही : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती कायदा (एससी-एसटी अ‍ॅक्ट) अर्थात अ‍ॅट्रॉसिटीबाबत दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मोदी सरकारची मागणी फेटाळली आहे. कोणत्याही सरकारी अधिकार्‍यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार दाखल झाल्यास थेट अटक न करता, प्राथमिक चौकशीनंतरच संबंधितांकडून अटकेबाबत निर्णय घेण्यात यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 20 मार्चला दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला दलित संघटनांनी कडाडून विरोध करत, देशभर बंद पुकारला होता. या बंददरम्यान उफाळलेल्या हिंसाचारात अनेकांचे बळी गेले होते. याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका दाखल करत, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती.