Breaking News

'सिमी'च्या १७ हस्तकांना ७ वर्षांची सक्तमजुरी


सिमीचा भारतात शिरकाव झाल्यापासून या संघटनेत काम करत असलेला सफदर नागोरी हा मध्य प्रदेश पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर तो कट्टरपंथी मुस्लिम दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी १९९८ साली पोलिसांनी त्याच्यावर पहिला गुन्हा नोंदवला होता. 

मात्र, २००८ सालापर्यंत तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत राहिला. अखेर मध्य प्रदेशमध्येच त्याला पोलिसांनी अटक केली होती. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अन्य आरोपींमध्ये अब्दुस सुभान कुरेशी ऊर्फ तवकीर हा मुंबईचा रहिवासी आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती..