Breaking News

राजस्थानात २५ हजार बाबूंची पदोन्नती, वेतनवाढ धोक्यात!


अनेक राजपत्रित अधिकाऱ्यांनी स्थावर मालमत्तेसंदर्भात विवरण योग्य वेळेत न दिल्याने राजस्थानातील तब्बल २५ हजार अधिकाऱ्यांची पदोन्नती व वेतनवाढीवर टांगती तलवार आली आहे. अनेक वेळा सूचना देऊनही तसेच मुदतवाढीनंतरही या अधिकाऱ्यांनी स्थावर मालमत्तेसंदर्भात अद्यापपर्यंत विवरण दिले नसल्याने सरकारने अखेर ही कठोर भूमिका घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली..