Breaking News

लालू जामिनानंतरही तुरुंगात


झारखंड उच्च न्यायालयाने उपचारासाठी दिलेल्या अंतरिम जामिनाच्या आदेशाची प्रत विशेष सीबीआय न्यायालयापर्यंत न पोहोचल्याने राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुन्हा एकदा तुरुंगात परतावे लागले आहे. झारखंड उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना नुकताच ६ आठवड्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर केला होता.

तेजप्रताप यादव यांच्या लग्नाच्या तोंडावर हा जामीन मिळाल्याने लालूंच्या कुटुंबीयांत आनंद पसरला होता. लालू आनंदाने आपल्या मोठ्या मुलाच्या लग्नात सहभागी झाले होते. मात्र, या आनंदाच्या भरात त्यांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत विशेष सीबीआय न्यायालयापर्यंत पोहोचविण्याचा विसर पडला. यामुळे लग्न सोहळा आटोपताच त्यांना पुन्हा नाइलाजाने तुरुंगात परतावे लागले आहे.