Breaking News

मनपा शाळेचा लोखंडी गेट अंगावर पडून एका मुलाचा मृृत्यू एक जखमी


नवी मुंबई, दि. 26, मे - नवी मुंबई महानगर पालिकेच्या खैरणे येथील शाळेचा लोखंडी गेट अंगावर पडून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या प्रकारणी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पालिका आयुक डॉ .रामास्वामी एन यांनी दिली. चौधरी कोपरखैरने येथील रा. फ. नाईक शाळेमध्ये शिकत होता. सौरभ चौधरी असे या मृत मुलाचे नाव आहे तो बोनकोडे गावातील शिवाजी नगर परिसरात रहात आहे.

आज खेळता खेळता काही मुले या शाळेच्या आवारात आली व त्यांनी हा गेट खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गेटच्या पिलर मधून निखळून, स्लायडिंग वरून घसरून हे लोखंडी जड गेट मुलांच्या अंगावर पडले. त्यात सौरभ आणि त्याचा मित्र निलेश जखमी झाले. यात निलेश च्या पायाला लगाले तर सौरभ च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये सौरभ मृत पावला तर निलेश याला उपचारासाङ्गी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खैरणे परिसरात बालाजी कॉम्प्लेक्स च्या बाजूला पालिकेच्या वतीने 40 कोटी खर्च करून शाळेसाठी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. काचेची शाळा म्हणून ही इमारत कुप्रसिद्ध असून राजकारण्यांच्या हट्टापायी गेल्या 15 वर्षांपासून  या शाळेचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. अनेकदा या बांधकामाचे डिझाईन बदलण्यातही आले आहे. शाळेला संरक्षक भिंत बांधली असून लोखंडी गेटही बसविले आहेत; मात्र अनेक वर्षांपासून हे काम सूरू असल्याने हे गेटही गंजले आहेत. सौरभचे वडील सरी हे टेलरिंग चे काम करतात तर आई गृहिणी आहे.