Breaking News

पंतप्रधांनानी मागितला जनतेचा अभिप्राय

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारचे 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने जनतेतून सरकारच्या कामकाजावर अभिप्राय मागितले आहे. त्यांनी एका ट्विटद्वारे लोकांना नमो अ ॅपमधील सर्वेक्षणात सहभाग घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता, स्वस्त आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी, ग्रामीण विद्युतीकरण, शेतकर्‍यांचे हित आणि भ्रष्टाचारा विरोधात लढा या मुद्द्यांवर सरकारचे मुल्यांकन करण्याबाबत लोकांना आवाहन केले. सर्वेक्षणात सहभागी होणार्‍या लोकांना अत्यंत निकृष्ट ते उत्कृष्ट अशा श्रेणीत आपली प्रतिक्रिया नोंदवता येईल. यावेळी त्यांनी लोकांना तुमचे मत विचारात घेतले जाईल असे आश्‍वासन देताना आपआपल्या मतदारसंघांमध्ये सरकारच्या उपक्रम आणि विकासकामांबाबत काय वाटते ते कळविण्यास सांगितले आहे. या अ‍ॅपमधील पिपल्स पल्स या श्रेणीत लोकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यावे हेही विचारण्यात आले आहे. यात महागाई, कायदा व सुव्यवस्था, शिक्षण, रोजगार, स्वच्छता, भ्रष्टाचार, शेतकरी कल्याण अशा क्षेत्रांचा समावेश आहे. जर इतर काही सुचना असतील तर त्याही पंतप्रधान मोदी यांना कळवाव्यात असेही सांगण्यात आले आहे.