कांदा १०० रुपयांनी गडगडला,लासलगाव बाजार समितीत ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल
मुस्लिम बांधवांचे उपवास सुरू झाल्याने बाजारातील कांद्याची मागणी कमी झाली आहे. तसेच सध्या पाच ते सहा राज्यातील कांदा बाजारात दाखल होत असल्याने दरात घसरण झाली आहे. सोमवारी पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात झाली परंतु परराज्यात मागणी नसल्याने दरात क्विंटल मागे १०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोमवारी ३०० रुपयांपासून ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर दर गेला. परंतु सरासरी ५५० रुपये दर मिळाला होता. तर खादीला केवळ ५० ते १०० रुपये क्विंटल दर मिळाला. सध्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार आणि दक्षिणेकडील राज्यांमधून कांदा बाजारात दाखल होत आहे. आवकच्या तुलनेत मागणी नसल्याने दरात घसरण झाली आहे.
