Breaking News

सेरेनाची इटालियन अाेपनमधून माघार

माजी नंबर वन सेरेना विल्यम्सने अाता अाठवडाभरात सलग दुसऱ्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तिने अाता अागामी इटालियन अाेपन टेनिस स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या १४ मेपासून या स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. तिने अातापर्यंत चार वेळा या स्पर्धेतील महिला एकेरीचा किताब जिंकला अाहे. त्यामुळे तिच्यावर सर्वांची नजर हाेती. मात्र, गत अाठवड्यात माद्रिद अाेपनमधून माघार घेणाऱ्या सेरेनाने अाता इटलीतही खेळणार नसल्याचे जाहीर केले.