Breaking News

हवाई दलाचे प्रमुख अाजपासून चार दिवसांच्या इस्रायल दाैऱ्यावर

नवी दिल्ली | हवाई दलाचे एअर चीफ मार्शल बी.एस.धनाेअा हे २१ ते २४ मेपर्यंत चार दिवसांच्या इस्रायल दाैऱ्यावर जात अाहेत. ते तेथे सुमारे २० देशांच्या हवाई दलप्रमुखांशी संबंधित विषयांवर चर्चा करतील. तसेच इस्रायलच्या हवाई दल स्थापनेला ७० वर्षे पूर्ण हाेत असल्याने त्यानिमित्त अायाेजित कार्यक्रमातसह क्षेत्रीय स्थिरतेशी संबंधित एका संमेलनातही सहभागी हाेतील. यासह इस्रायलमधील हवाई दलाची ठिकाणे, सैन्य केंद्रे, वारसास्थळे अादी ठिकाणांना भेट देतील. या दाैऱ्यामुळे दाेन्ही देशांतील सहकार्य वाढेल, अशी अाशा व्यक्त केली जात अाहे.