Breaking News

अश्विनी आहेर -थिटमे यांच राज्यस्तरीय सेट परीक्षेत घवघवीत यश


प्रवरानगर : लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी आहेर -थिटमे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत लाइफ साइंसेस या विषयात २०० मार्क घेउन त्या उत्तीर्ण झाल्या.
सेट परीक्षेसाठी यावर्षी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून एकून ६२ हजार ४०४० परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी फक्त ४ हजार ०६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सेट परीक्षेचा‌ एकून निकाल हा ६ . ५२ टक्के लागला. यासाठी आहेर -थिटमे यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे आणि वनस्पतिशास्र विभागप्रमुख डॉ. रामदास बोरसे व त्यांचे प़ी. एच. डी. मार्गदर्शक डॉ. अनिल वाबळे व पी. जी. प्रमुख डॉ. महेश खर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. अश्विनी या लोणी येथील अशोक नारायण आहेर यांची कन्या व सावरगावतळ ता. {संगमनेर} येथील नामदेव थिटमे यांच्या स्नुषा आहेत.

दरम्यान, सेट परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, उपप्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ, प्रा. दत्तात्रय थोरात, प्रा. छाया गलांडे, डॉ. महेश खर्डे आदींसह शिक्षकांनी अश्विनी आहेर -थिटमे यांचे अभिनंदन केले.