रेहकूरी अभयारण्यातील कामांत भ्रष्टाचार?
कर्जत : महाराष्ट्रात काळविटासाठी प्रसिद्ध असलेल्या रेहेकुरी अभयारण्यामध्ये होत असलेल्या कामात भ्रष्टाचार झाला असून, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत रेहेकुरी येथील नागरिक कर्जत तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसले.
येथे काळविटांचे वास्तव्य असल्याने व तालुक्यात माळढोक अभयारण्य असल्याने येथील वन विभागाकडे मोठ्या प्रमाणात निधी येत असतो, मात्र येथे होणारी कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून, विकास कामाच्या नावाखाली वनविभागातील अधिकारी व कर्मचारी संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होण्याच्या मागणीसाठी रेहेकुरी गावातील ग्रामस्थ कालपासून कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
याबाबत दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, 2015-18 पर्यंत विविध विकासकामे झालेली असून, एनआयसी स्थापन झाल्यापासून त्यावर किती निधी आला, त्यातून कोणती कामे झाली याची माहिती मिळत नाही, शासन गॅॅस लाभार्थ्यांना गॅॅस भरण्यासाठी अनुदान असते ते अनुदान एकाही लाभार्थ्याला मिळालेले नाही. रेहेकुरी अभयारण्यातील क्वार्टर दरवर्षी दुरुस्त केल्या जातात, जाणून बुजून निकृष्ट दर्जाची कामे करून दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जातो. रेहेकुरी अभयारण्य येथील सर्व कामे ढगेश्वर मजूर संस्था थेटेवाडी या संस्थेच्या नावावरच केली जातात. सूळ- वनक्षेत्रपाल रेहेकुरी व ढगेश्वर मजूर संस्था यांचे नाते संबंध आहेत, त्याची सखोल चौकशी करावी. तसेच गवत निर्मूलनासाठी किती निधी आला, वन क्षेत्रात फायर वॉचर किती बसवले, जाळरेशेसाठी दरवर्षी किती पैसा येतो व किती खर्च होतो अशी माहितीही या अर्जातून विचारण्यात आलेली आहे.
या निवेदनावर परमेश्वर मांडगे, रावसाहेब मांडगे, भाऊसाहेब मांडगे, संदिप मांडगे, दादासाहेब मांडगे, सतिष मांडगे, तात्याराम मांडगे, ज्ञानदेव मांडगे, जनार्धन मांडगे, किशोर मांडगे, शोभा बाळासाहेब मांडगे, बाळासाहेब मांडगे, हनुमंत मांडगे, किरण सूर्यवंशी आदीसह अनेकांच्या सह्या आहेत. आंदोलकांशी नायब तहसीलदार आल्हाट यांनी चर्चा केली.प्रा. अश्विनी आहेर-थिटमे सेट परीक्षा उत्तीर्ण
