कुशल मनुष्यबळ घडविणे हे विद्यापीठाचे लक्ष्य -कुलगुरू डॉ. करमळकर
पुणे, दि.30 मे - विद्यापीठाच्या सर्व विभागांद्वारे रोजगार प्रधान शिक्षणाचा विचार असतो. सध्या नोकर्या उपलब्ध असल्या तरी कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कौशल्यप्रधान तरुणाई घडवणे हे विद्यापीठाचे लक्ष्य असेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शंतनूराव किर्लोस्कर अध्यासनातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात डॉ. करमळकर बोलत होते.
प्राधान्याने विचार केला आहे. त्याचाच म्हणून महाराष्ट्रातील सचोटीने गुणवत्ताप्रधान व्यवसाय करणारे शंतनुराव किर्लोस्कर यांच्या नावे स्वतंत्र अध्यासन विद्यापीठात सुरू आहे. या अध्यासनाच्या वतीने व्यावसायिकता हा विचार म्हणून विद्यार्थी व समाजातील विविध घटकांमध्ये रुजावा याकरिता नवीन उपक्रम सुरू केला जात आहे, असेही डॉ. करमळकर म्हणाले.