Breaking News

डीएसकेंची मेहुणी अनुराधा पुरंदरेंसह 7 जण अटकेत

पुणे - गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या प्रकरणाशी संबंधित नातेवाईकांना पोलिसांनी आता लक्ष्य केले आहे. सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक केली. अनुराधा यांना पुण्यातल्या निगडी भागातून अटक करण्यात आली. डीएसके यांच्या पत्नी हेमंती यासुद्धा तुरुंगात आहेत. या प्रकरणात हेमंती यांच्यासोबत अनुराधा पुरंदरे यांचा महत्वाचा सहभाग आहे. हेमंती यांनी केलेल्या पैशाच्या गैरव्यवहारात अनुराधा यांचाही हात असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसांनी अनुराधा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच त्या गायब झाला होत्या. पोलीस अनुराधा यांचा शोध घेत होते. अखेर त्या निगडी भागात एका परिचिताकडे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात डीएसके दाम्पत्या व्यतिरिक्त 13 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यातल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली असून आजची ही सातवी अटक आहे. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी सई वांजपे, डीएसएके कंपनीचा सीईओ, आर्थिक विभागाचा प्रमुख यांना अटक करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर 5 जूनला सुनावणी होणार आहे.