Breaking News

सलग 15 व्या दिवशी पेट्रोल डिझेल दरवाढ महाराष्ट्रासह देशभरात नागरिक हैराण

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या किमतीत सलग 15 व्या दिवशी देखील वाढ झाली असून, मुंबईत पेट्रोलचे दर 86.08 प्रतिलिटर झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना हैराण के ले असून त्यांचे आर्थिक व्यवस्थापन सातत्याने कोसळत आहे. महानगरीय शहरांमध्ये सुधारित दराप्रमाणे पेट्रोलचे प्रतिलिटर दर मुंबईत 86.08 रुपये, चेन्नई 81.11 रुपये, कोलकाता 80.76 रुपये आणि दिल्ली 78.27 रुपये आहेत. तर डिझेलचे प्रतिलिटर दर मुंबईत 73.64 रुपये आणि दिल्लीत 69.17 रुपये आहेत. इंधनाच्या किमतीत होणारी वाढ दररोज ऐतिहा सिक उच्चांक गाठत असल्याने मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकार लवकरच यावर उत्तर काढेल, असे आश्‍वासन दिले आहे. मात्र इंधनाच्या किमतीत कोणतीही कमी होत नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे. यावेळी बोलताना प्रधान यांनी इंधनाच्या उत्पादनात घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत दरवाढ हे घटक पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम करत असल्याचे सांगितले.