Breaking News

राजेंद्र पटले यांचा भाजपात प्रवेश

भंडारा: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपात प्रवेश केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवास्थानी प्रवेश केला. पटले यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा र विवारपासून होती. परंतु तेव्हापासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. भ्रमणध्वनीवरही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबद्दल ठामपणे सांगता येत नव्हते. दरम्यान, मंगळवारला त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. शिवसेना ही विदर्भात अजिबात लक्ष देत नाही तसेच कुठलिही निवडणूक असली तरी सेनेचा दुर्लक्ष असते. तसेच या लोकसभा पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी राजेंद्र पटले इच्छूक होते. परंतु शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज पटलेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात घेतलेल्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते.