Breaking News

बँक कर्मचारी 30 व 31 मे रोजी संपावर

चेन्नई : येत्या 30 मे पासून सरकारी व खासगी बँक कर्मचारी 48 तासाचा संप पुकारणार आहेत. हा संप कर्मचार्‍यांच्या पगारवाढी संदर्भात आहे. सहा बँक कर्मचारी संघटनांची मिळून बनलेली ’युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन’ (यूएफबीयू) ने हा संप पुकारलेला आहे. यासंदर्भात एक सूचना इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) ला देण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 2012 मध्ये एका वेतन करारानुसार बँक कर्मचाऱयांच्या पगारामध्ये 15 टक्यांनी वाढ होणार होती. परंतु ऑल डंडिया बँकिंग एंप्लाई असोसिएशन (एआयबीईए) चे सरचिटणीस सी. एच. वेंकटचेलम यांच्या म्हणन्यानुसार 31 मार्च 2017 पर्यंत केवळ 2 टक्क्यांनीच पगारवाढ करण्यात आली आहे. बँक कर्मचार्‍यांना इतर सरकारी व खासगी कर्मचार्‍यांपेक्षा कमी वेतन असल्याचे म्हटले जात आहे.