Breaking News

संपानंतर पहिल्या दिवशी 20 बस मार्गावर धावल्या


सोलापूर, दि. 17, मे - परिवहन कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी मागील 35 दिवसांपासून सुरू असलेला संप संपला. बस मार्गावर आल्या. सकाळी 12 तर दुपारी 20 बस मार्गावर होत्या. चालक नसल्याने एरव्ही धावणार्‍या 38 बस मार्गावर काढता आल्या नाहीत. मंगळवारपासून 35 बस मार्गावर धावतील, असे परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी सांगितले. 
परिवहन कर्मचार्‍यांनी 10 महिन्यांच्या वेतनासाठी 9 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला होता. तो मिटवण्यासाठी वारंवार बैठक झाल्या. शनिवारी महापौर निवास येथे महापौर शोभा बनशेट्टी यांनी बैठक घेतली. दोन महिन्यांचे वेतन देण्याचे आयुक्तांनी मान्य केले. त्यामुळे सोमवारपासून संप मागे घेऊन कर्मचारी कामावर रूजू झाले. 

परिवहन विभागातील कर्मशाळेतील कर्मचारी रूजू झाले. पण चालक नसल्याने सकाळच्या सत्रात 12 तर दुपारच्या सत्रात 20 बस मार्गावर गेले. 35 बस चालू स्थितीत आहेत. त्या बस मंगळवारी धावतील. संप काळात 60 लाख रुपयांचे नुकसान झाले. संप काळातील वेतन परिवहन कर्मचार्‍यांना अदा केले जाणार नाही, असे परिवहन व्यवस्थापक हराळे यांनी सांगितले.