Breaking News

12 गावातील ग्रामपंचायतीचा लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय


भंडारा, दि. 18, मे - भंडारा जिल्यात येणार्‍या 28 मे ला लोकसभा पोटनिवडणुकी करिता मतदान होणार असून तुमसर तालुक्यातील 12 गावांत सिंचनाची सोय झाली नाही करिता गावकरी गावसोडून जात आहेत म्हणून येणार्‍या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याकरिता 12 हि ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प असून हा प्रकल्प 2011 ला पूर्णत्वास आला आहे. हा प्रकल्प मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बावनथडी नदीवर तयार करण्यात आला असून याचा उद्देश शेतकर्‍यांना सिंचना करिता पाणि उपलब्द करून देणे हा होता, मात्र याच प्रकल्पाचा पाणि हा 50 किलोमीटर पर्यंत पोहचला असून जवळच असलेल्या गणेशपूर,पवनारखारी,गोबरवाही,येदरबुची,सुंदरटोला,सीतासावंगी,गुडरी,खंडाळ,सोडेपूर,हेटी,धामनेवाडा,खौरटोला,या बारा गावांना मिळत नाही करिता येणार्‍या 28 मे ला होणार्‍या लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान क रणार नाही असा पवित्रा या गावातील गावकर्‍यांनी घेतला असून तसा ठरावही ग्रामपंचायतीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. या परिसरात मागील पाच वर्षांपासून पाऊस पडत नाही करिता शेतात एकही दाणा होत नाही मग या लोकांनी करावं काय, ग्रामीण भागात रोजगार हमी योजना राबविली जाते मात्र मे महिना येऊ नही कामे सुरु झाली नाही मग लोकांनी काय करावा अशा प्रश्‍न या गावकर्‍यांपुढे आला असून काही गावातील लोक बाहेर गावी पोटाची खडगी भरण्याकरिता पलायन केले असून संपूर्ण परिसर हा ओसाड पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, जे कोणी गावात आहेत त्यांना काम नसल्यामुळे पानटपरीवर पाहावयास मिळत आहे, संपूर्ण गावचे गाव खाली झाले आहे, या बारा गावातील लोकांनी संघर्ष समिती तयार करून आंदोलने मोर्चे केले मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आश्‍वासना व्यतिरिक्त काकीही दिले नाही, त्यामुळे आज या गावांना सिंचनाची सोया झाली नाही या कं टाळून आज या गावकर्‍यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकानुमतें ठरविले असून जो पर्यंत सिंचनाची सोया होणार नाही तोपर्यंत येणार्‍या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे गावकरी बोलत आहेत.