Breaking News

विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी झोकुन दया - जयंत पाटील

नाशिक, दि. 18, मे - राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधान परिषदेत नाशिकची जागा अत्यंत महत्वाची असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असे सांगत निवडणूकित झोकून देउन काम क रण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिका-यांना केले. आज नाशिक येथे पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांसमवेत निवडणूकीची मोर्चेबांधणी करण्यात आली. 
विधान परिषद निवडणूक मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. विधानपरिषदेत विरोधीपक्षनेतेपद आणि सभापतीपद राखण्यासाठी राष्ट ्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच नाशिकच्या निवडणूकित सेना भाजपचा दोस्ताना जवळपास तुटल्यातच जमा आहे. भाजपने आपली भुमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवल्याने याचा फायदा घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच नाशिकच्या निवडणूकित लक्ष घातले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नाशिकमध्ये मेळावा घेत उमेदवारामागे ताकद उभी करण्याचे आवाहन के ले. 

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवन येथे जिल्हयातील प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेत निवडणूकिचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी काही पदाधिका-यांशी वन टू वन चर्चा करत माहीती घेतली. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पक्षाच्या मतदारांना सहलीला पाठवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचेही मतदार सहलीला पाठविण्यासंदर्भात यावेळी नियोजन करण्यात आले. साम, दाम, दंड भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा जिंका असे आवाहन त्यांनी यावेळी पदाधिका-यांना केले. यावेळी प्रत्येकाला जबाबदारीचे वाटपही करण्यात आले.