Breaking News

भांबोर्‍यातील इंदिरानगरमध्ये मिळणार शुध्द पिण्याचे पाणी


कुळधरण : कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील इंदिरानगर वसाहतीतील नागरीकांना ग्रामपंचायतीमार्फत शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. 14 व्या वित्त आयोगातुन ही योजना राबविण्यात आली.

या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन भांबोरा येथील ज्येष्ठ नागरीक रावसाहेब लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अशोक चव्हाण, उपसरपंच कालीदास गावडे, ग्रामविकास अधिकारी बी. एम. शिंदे, नितीन पाटील, सागर रंधवे, राजेंद्र लोंढे, वसंत लोंढे, संतोष रंधवे, शरद कुंभार, जालिंदर कोरे, संदिप हिरभगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इंदिरानगर भागात पिण्याच्या शुद्ध पाण्याची उपलब्धता नसल्याने सरपंच अशोक चव्हाण यांनी 14 व्या वित्त आयोग निधीतून प्राधान्याने हे काम पूर्ण करुन घेतले.

शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण झाल्याने येथील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी महिलांना पाण्याच्या शोधार्थ दूरपर्यंत भटकंती करावी लागत असे. अनेक कुटुंबांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागेे. आता इंदिरानगर भागातच प्रकल्प उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यापुढे आता परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याने येथील नागरिक निश्‍चिंत झाले आहेत, मात्र त्याचबरोबर पाणी काटकसरीने वापरणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण आज पाण्याचा अपव्यय केल्यास तीच पाण्याची उद्याची गरज भागली जाणार नाही.