Breaking News

11 जुनला भविष्य निर्वाह निधी अदालत


पुणे - भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयात येत्या 11 जुनला या निधीच्या सदस्यांसाठी भविष्य निर्वाह निधी अदालत आयोजित केली आहे. या निधीच्या कामकाजाविषयी अथवा त्यांना येणार्‍या अडचणींविषयी संबंधीत सदस्यांनी त्या दिवशी सकाळी साडे दहा ते साडे बारा यावेळेत ईपीएफओ ऑफीस गोळीबार मैदान, पुणे कॅन्टान्मेंट येथे आपल्या तक्रार अर्जासह उपस्थित राहावे असे आवाहन इपीएफओ ऑफिस तर्फे करण्यात आले आहे.

तसेच हयातीचा दाखल न दिल्याने गेल्या जानेवारी महिन्यापासून अनेक निवृत्तीवेतन धारकांची पेन्शन बंद आहे. अशा खातेदारांनी बँकेमार्फत आपल्या हयातीचा दाखला घेऊन तो ईपीएफओ कार्यालयात जमा करावा. नोव्हेंबर 2017 पर्यंत ज्या निवृत्ती वेतनधारकांनी आपले डिजीटल जीवन प्रमाण पत्र जमा केले नसेल त्यांनी आपले हे हयातीचे दाखले जमा करावेत. अधिक माहितीसाठी ईपीएफओच्या पुणे अथवा आकुर्डी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.