गोधेगांवला आजपासून हरिनाम सप्ताह
गोधेगांव येथील हनुमान मंदिरात सोमवारपासून {दि. २३ } हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज व ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराज आणि संत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने आणि महंत रामगिरीजी महाराज व प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह होत आहे. या सप्ताह कालावधीत परमपूज्य रामगिरी महाराज, ह. भ. प. कल्याण महाराज, ह. भ. प. आसाराम गायके महाराज, ह. भ. प. भरत महाराज, ह. भ. प. रामभाऊ महाराज बर्डे, ह. भ. प. संदिपान महाराज, ह. भ. प. माउली महाराज आदी मान्यवरांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे. भाविकांनी कीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोधेगांव येथील सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
