Breaking News

विकास कामांमुळे ‘संगमनेर’ आघाडीवर : तांबे धांदरफळ खुर्दला विकासकामे

संगमनेर प्रतिनिधी - माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सातत्याने अनेकविकास कामे आणि विविध योजना सुरु आहेत. या विकासकामांमुळे संगमनेर तालुका राज्यात आघाडीवर आहे, असे गौरवोदगार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काढले.

धांदरफळ खुर्द येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्यावतीने जि. प प्राथमिक शाळा दुरुस्ती, बिरोबा मंदिरा समोरील प्लेव्हींग ब्लॉक, बंधारा व किटीवेअर दुरुस्ती कामांचा शुभारंभ सत्यजित तांबे यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सभापती निशा कोकणे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, मिलींद कानवडे, अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते मुरलीअप्पा खताळ, रमेश नेहे आदी उपस्थित होते.

तांबे म्हणाले, तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने विविध योजना व उपक्रम येथे सुरु आहेत. शिक्षण, कृषी, सहकार, व्यापार आदी क्षेत्रात संगमनेर शहर आघाडीवर आहे. युवकांनी शेतीबरोबरच व्यवसायात आधुनिकता आणली पाहिजे. सध्याच्या युगात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्याचा योग्य उपयोग करुन घ्यायला हवा. ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून कठोर परिश्रम करावेत. धांदरफळ खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळा दुरुस्ती, बिरोबा मंदिरा समोरील प्लेव्हींग ब्लॉक, बंधारा व किटीवेअर दुरुस्ती या कामांमुळे गावच्या विकासाला आणखी चांगली गती येईल. 

यावेळी सभापती निशा कोकणे, रामहरी कातोरे, मिलींद कानवडे यांचीही भाषणे झाली. यावेळी योगेश खताळ, गोपीनाथ गोडसे, भाऊसाहेब शिरतार, सुरेश खर्डे, भानुदास शेटे, संपत खताळ, मिलींद खताळ, संदीप खताळ, नवनाथ कातोरे, सतिष खताळ, संगम आहेर , शरद कोकणे आदी उपस्थित होते.