हागणदारीमुक्तीत ‘अव्वल’ हा दावा फोल
राहुरी प्रतिनिधी - जिल्ह्यातील सधन व बागायती तालुका अशी ओळख असलेला राहुरी तालुका हागदाणदारीमुक्तीत अग्रेसर आहे. परंतु तालुक्याचे मुख्यालय असलेले राहुरी शहर आजही हागणदारी मुक्त झालेले नाही. येथे शहराच्या काही प्रभागातील पुरुष व महिला आजही शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असल्याचे शहरात चित्र पहावयास मिळते. त्यामुळे महाराष्ट्र हागणदारीमुक्तीत ‘अव्वल’ हा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.
शहरातील काही प्रभागात वाड्या वस्त्या व अविकसित भाग समाविष्ट असलेल्या परिसरातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. येथे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरुन नागरी आरोग्य धोक्यात आणले जात आहे. प्रभाग क्रमांक १ ( वार्ड नंबर ७) मधील मुलनमाथा परिसरातील नागरिक महिला व पुरुष आजही शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जाणे पसंत करत आहेत. याकडे स्थानिक नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाले आहे. मुलनमाथा परिसर हा शहरातील विस्थापित नागरिकांचा भाग आहे. येथे नगरपरिषद प्रशासनाच्या मुलभूत सुविधा पूर्णपणे पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य ‘रामभरोसे’ आहे. येथे हागणदारीमुक्तीचा संदेश व याबाबतीत नागरिकांचे प्रबोधन झाले नाही. त्यामुळे येथे आजही लोक उघड्यावर शौचास बसतात. येथील अठरा एकराचा काही भाग येथील लोकांची मुक्त हागणदारी आहे. याविषयी शहराचा आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे.
येथे ग्रामीण भागातील ‘गुडमॉर्निंग’ पथकासारखे शहरी ‘गुडमॉर्निंग’ पथक कार्यरत झाल्यास भल्या सकाळी येथील हागणदारी व येथे उघड्यावर शौचास बसणा-यांचे चित्र प्रशासनाच्या नजरेस पडू शकते. शहराचे लोकप्रतिनिधी येथे सुविधा देण्यास कमी पडत आहेत. मुलनमाथा परिसर पूर्णपणे हागदारीमुक्त झालेला नसल्याने निदान आज तरी प्रशासनाचा हागणदारीमुक्तीचा उद्देश असफल ठरल्याचे समोर आले आहे.