Breaking News

विदयार्थ्यांना उंच भरारी घेता यावी म्हणून शैक्षणिक उपक्रमावर भर देणार - सुनिता गडाख


नेवासा येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व पंचायत समिती नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांच्या तालुकास्तरीय शैक्षणिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून सभापती सुनिता गडाख या बोलत होत्या. गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे , पंचायत समितीचे सदस्य रविंद्र शेरकर, शोभाताई आलवणे, सुनिता आडेप, उज्वलाताई लगे व्यासपीठावर उपस्थित होते. 

गटशिक्षणाधिकारी विलास साठे यांनी प्रास्ताविकामध्ये शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद व्हावा शाळेच्या उन्नतीसाठी शालेय व्यवस्थापन समितीचा सहभाग सक्रियतेने व्हावा म्हणून या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना गडाख पुढे म्हणाल्या की शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण व्यवस्थापनाला कृतिशील कार्याची जोड देणे गरजेचे आहे, तालुक्यातील 19 केंद्रातून 21 विविध स्टॉल येथे लावण्यात आलेले आहे त्यात शिक्षकांच्या प्रेरणेनेच विद्यार्थ्यांनी अनेक उपकरणे तयार केलेली आहेत. यावेळी प्रा. वांढरे,प्रा. विटनोर, दत्तात्रय शिंदे, अलीम शेख संजय ताठे शिवाजी जाधव भारत गरड,दौलतदेशमुख,भाऊसाहेब फोलाने,दिनकर गारुळे रामेश्‍वर निकम बाळासाहेब भणगेरविंद्र घाडगे संतोष साळवे, समीर शेख,महादेव घोडके,सचिन बेळगे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अर्जुन फाटके यांनी आभार मानले.