Breaking News

‘वायएसआर’ काँगे्रसच्या पाच खासदारांचे राजीनामे

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप शुक्रवारी वाजले. कावेरी पाणी वाटप, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा या मुद्द्यांवरून सभागृहाचे कामकाज वारंवार खं डित होत आहे. संसदेचा शुक्रवारी अखेरचा दिवस अपेक्षेप्रमाणे वादळी ठरला. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरून ’वायएसआर’ काँग्रेसच्या पाच खासदारांनी आपले राजीनामे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे सादर केले. पक्षाचे खासदार वाराप्रसाद राव वेलागपल्ली यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. पोटनिवडणुकीसाठी पुरेशा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे निवडणूक लढणार असल्याचे राव म्हणाले. आंध्रला प्रदेशला विशेष राज्याचा मागणीवरू न तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांनी यापूर्वीच आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे विशेष राज्याच्या मुद्द्यावरून दक्षिणेच्या राजकारणात वेगवान घडामोडी पहायला मिळत आहे. आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचा मुलगा वाय.एस. जगनमोहन रेड्डीने हा पक्ष अंगिक ारला व त्याचे सर्वेसर्वा पद धारण केले. वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष प्रामुख्याने आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये कार्यरत आहे. भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेत वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे 9 खासदार आहेत. तसेच 67 आमदारसंख्या असलेला वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.