Breaking News

नि:स्वार्थी कार्यकर्त्यांमुळे भाजपला ’अच्छे दिन’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली असल्याचे मोदी म्हणाले. भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आज दुपारी देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करणार आहेत. मुंबईत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत जंगी शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आणि हद्य असल्याचे म्हटले आहे. पक्षाचा कार्यकर्ता सशक्त आणि परिपूर्ण भारत बनविण्यासाठी कार्यरत आहे. उदात्त ध्येय बाळगलेल्या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे देशातील नागरिकांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले.