Breaking News

खा. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बेळगाव : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राऊत यांच्यासह चौघा जणांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर, प्रकाश बेळगोजी व स्थानिक नेते आर. एस. नाईक यांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी बेळगाव ला स्वतंत्र करत, केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली, होती, त्यांसाठी प्रसंगी क ायदा हातात घेण्याची भाषा देखील राऊत यांनी वापरली होती.