Breaking News

नेवासा एसटी बसच्या आगाराच्या वाहकाकडून पत्रकारास अरेरावी व दमदाटी



शेवगाव - नेवासा जाणार्‍या बसमधून पत्रकार आर आर माने प्रवास करत असताना तिकीट घेऊन उरलेले पैसे वाहकाकडे मागितले असता त्या बसचा वाहकाने माने यांना अरेरावीची भाषा वापरुन अपमान केला.

त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार आर.आर. माने यांनी वाहकास कमीत कमी माझ्या वयाचे भान ठेऊन तरी बोला, असे सांगितले तरी वाहकाने कोणाचेही ऐकायला तयार नव्हते, व अर्वाच्य भाषेचा वापर करून पत्रकार माने यांना अपमानित केले, नंतर दहाच्या दरम्यान आर आर माने यांना झालेल्या मनस्तापामुळे रक्तदाबाचा त्रास सुरू झाला व त्यांना तत्काळ भेंडा येथील खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, व तिथे त्यांना औषध उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली, घडलेल्या घटनेची माहिती तालुक्यातील पत्रकारांना समजल्यानंतर तात्काळ पत्रकार माने यांच्या तब्येतीची विचारपूस करू लागले व नंतर संध्याकाळी आठ वाजता शेवगाव वाहतूक नियंत्रकाकडे संबंधित वाहकाची लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली व संबंधित वाहकावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली. आठ दिवसात कारवाई न झाल्यास कोणत्याही क्षणी तालुका पत्रकार यासंदर्भात शेवगाव आगर प्रमुख यांच्या दालनासमोर उपोषणास बसणार आहेत.