Breaking News

बेलापूरातील तरुणी बेपत्ता


श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील 22 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली असून दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कामावर जाते असे सांगून ती घरातून निघून गेली. याबाबत शहर पोलीस स्टेशन मध्ये दि. 24 एप्रिल रोजी मिसिंग नं. 26/18 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी आंनद राधेश्याम चायल यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यात त्यांनी म्हंटले आहे की दिपा राधेश्याम चायल ( वय 22, धंदा - खाजगी नोकरी रा. बेलापूर बु. ता. श्रीरामपूर ) ही दि 23 रोजी सकाळी 11 वाजता कामावर जाते, असे सांगून घरातून निघून गेली. तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. पुढील तपास पो. नि. संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. भिंगारदे हे करीत आहेत.